बुलढाणा मुख्य संपादक दमदार २८न्यूज सागर पाटील गव्हाड
योगेश राठोड
प्रतिनिधी यवतमाळ
दि. 14/03/2026 रोजी सकाळी 11 वा. सदानंद महाराज मठ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा -1) शिबीर घेण्यात येत आहें. या शिबिरामध्ये नागरिकांना १५ पेक्षा अधिक महसुली सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शिबिरामध्ये उपलब्ध सेवा पुढीलप्रमाणे :
- प्रलंबित फेरफार
- ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती
- डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८-अ उताऱ्यांचे वाटप
- उत्पन्न, रहिवासी आणि जात प्रमाणपत्र
- नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र
- अकृषिक (NA) परवानगी
- अकृषिक (NA) तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा
- नवीन व्यवस्थापनानुसार ‘सनद’ प्रक्रियेची माहिती
- सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे
- विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप
- तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा
- घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज
- अॅग्रीस्टॅक आणि पी.एम. किसान नोंदणी
- भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी ‘कमी-जास्त पत्रके’ तयार करून गाव दप्तर अद्यावत करणे
तरी सालोड (हि.)व परिसरातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल प्रशासना कडुन करण्यात येत आहे.
ग्राममहसूल अधिकारी कार्यालय,सालोड (हि.)