बुलढाणा मुख्य संपादक दमदार २८न्यूज सागर पाटील गव्हाड

नागापूर येथिल नागरिकांची आमदार सिद्धार्थ खरात

यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी


मेहकर /प्रतिनिधी सुनील दांडगे
नागापूर (ता. मेहकर) येथे “जल जीवन मिशन” अंतर्गत “हर घर नल, हर घर जल” योजना राबविण्यात आली असून, यासाठी सुमारे ₹1,25,34,000/- इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सदर योजना प्रत्यक्षात पूर्णपणे अपयशी ठरली असून गावात आजपर्यंत पाणीपुरवठा सुरू झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.त्या मुळे येथिल नागरिकांनी आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडे संपुर्ण कामाची चौकशी करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा आज दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी एका निवेदनद्वारे देण्यात आला आहे,
या बाबतीत सविस्तर असे की दिनांक 31 मार्च रोजी मेहकर येथे झालेल्या वार्षिक आमसभेत संबंधित पाणीपुरवठा विभागातील अभियंता आर. जी. धावे यांनी नागापूरसह काही गावांमध्ये ही योजना “पूर्ण” झाल्याचा अजब दावा केला होता . मात्र हा दावा प्रत्यक्ष परिस्थितीशी पूर्णपणे विसंगत, भ्रामक व दिशाभूल करणारा होता.
कारण गावातील महिलांना आजही डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी पायपीट करावी लागत असून, दुसरीकडे कागदोपत्री योजना पूर्ण दाखवली जात आहे. यावरून स्पष्ट होते की संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक खोटी माहिती सादर करून शासन व लोकप्रतिनिधींची दिशाभूल करत असल्याचे दिसून येत आहे,
सदर प्रकरणात उपविभाग अभियंता आर. जी. धावे यांच्यावर शासकीय निधीचा गैरवापर, अपूर्ण कामे पूर्ण दाखवणे व खोटी माहिती सादर करणे आमसभेत लोकप्रतिनिधी व नागरिकांची दिशाभूल करणे कर्तव्यातील गंभीर निष्काळजीपणा दिसून येत असल्याचा आरोप निवेदन कर्त्यांनी केले आहे त्यामुळे सदर प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी चौकशी अंती
संबंधित दोषींनवर फौजदारी गुन्हा (FIR) दाखल करावा
संपूर्ण योजनेचे तांत्रिक व आर्थिक ऑडिट (Audit) करण्यात यावे आणि
नागापूर येथिल नागरिकांसाठी त्वरित पाणीपुरवठा करावा
अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदर निवेदनावर तात्काळ कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे,सदर निवेदनावर कुंडलिक खिल्लारी, रत्नमाला खिल्लारी, शारदा खिल्लारी, रंजित गायकवाड, संजय धाबे, सुनिता धाबे, भागवत धाबे, सोनाली खोडके, किशोर खोडके, सादिक कौसर, जावेद निजाम,वंशिका खोडके, रुख्मिना खनपटे यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.