मेहकर प्रतिनिधी दमदार २८न्यूज
हळदीचे बेणे चोरले; शेतातून दहा पोती लंपास
शेतात ठेवलेले हळदीचे दहा पोते बेणे चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मेहकर तालुक्यातील हिवरा साबळे शिवारात घडली.

दहा पोते चोरून नेल्यानंतर शेतात उरलेले तीन पोते हळद बेणे.
हिवरा साबळे शेतशिवारातील घटना
मेहकर : शेतात ठेवलेले हळदीचे दहा पोते बेणे चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मेहकर तालुक्यातील हिवरा साबळे शिवारात सोमवार, २३ मार्च रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
डोणगाव पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या हिवरा साबळे येथील गजानन नारायण साबळे यांनी गट क्रमांक १५ मध्ये सेलम जातीची अर्धा एकर हळदीची लागवड केली होती. २२ मार्च २०२६ रोजी त्यांनी हळदीचे पीक काढले. त्याचे बेणे तयार करण्यात आले. संध्याकाळी १३ पोते हळद बेणे एका शेतकऱ्याला देण्यासाठी ठेवले. शेतातच हा माळ ठेवला होता. मात्र, २३ मार्च सकाळी हळद घेऊन जाण्यासाठी शेतकरी शेतात गेला असता दहा पोते बेणे चोरीस गेल्याचे आढळून आले. घटनास्थळी केवळ तीनच पोते दिसून आले. पोत्यापासून रत्नापूर रस्त्याकडे जाणाऱ्या चोरट्यांच्या पाऊल खुणा दिसून आल्या. त्यावरून अज्ञात चोरट्यांनी १३ पैकी १० पोते हळद चोरून नेल्याचे दिसून आले.
गजानन साबळे यांच्या शेतातील हळद कित्येक शेतकऱ्यांनी लागवडीकरिता मागितले होती. या हळदीवर अज्ञाताने नजर ठेवून चोरून नेली.
याप्रकरणी गजानन साबळे हे डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये कैफियत देण्यासाठी हजार झाले. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.