बुलढाणा मुख्य संपादक दमदार २८न्यूज सागर पाटील गव्हाड

जिल्हा प्रतिनिधी
योगेश राठोड
यवतमाळ …जिल्हा युवक काँग्रेसची महत्त्वपूर्ण आढावा बैठक दिनांक ३ एप्रिल,(शुक्रवार) रोजी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय,आर्णी रोड,यवतमाळ येथे जिल्हाध्यक्ष तथा यवतमाळ नगरपालिकेचे नगरसेवक प्रमोद बगाडे यांच्या नेतृत्वात उत्साहात पार पडली.
या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी अजयजी चिकारा,प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे,उपाध्यक्ष कपिल ढोके,यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार लोकनेते मा.बाळासाहेब मांगुळकर,प्रदेश सरचिटणीस भगवान पंडागळे,सचिव आयुषी देशमुख,सचिव कौस्तुभ शिर्के,तसेच नॅशनल स्टुडन्ट युनियन ऑफ इंडिया (NSUI) चे जिल्हाध्यक्ष गौरव राठोड,यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष,विधानसभा अध्यक्ष,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी युवक काँग्रेस संघटन बळकट करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले शिवराज मोरे यांनी युवकांनी गावपातळीवर सक्रिय राहून पक्षाची विचारधारा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावी,असे आवाहन केले.कपिल ढोके यांनी युवक काँग्रेस ही पक्षाची खरी ताकद असून नव्या नेतृत्वाला संधी देत संघटन विस्तारावर भर देण्याचे सांगितले.अजय चिकारा यांनी राज्यभर युवक काँग्रेस अधिक सक्षम करण्यासाठी शिस्त, संघटन आणि सातत्यपूर्ण कामाची गरज अधोरेखित केली.बाळासाहेब मांगुळकर यांनी स्थानिक पातळीवर जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यावर भर देण्याचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद बगाडे यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन अथर्व भोयर यांनी केले.तर आभार प्रदर्शन अभिषेक बगाडे यांनी मानले.