बुलढाणा मुख्य संपादक दमदार २८न्यूज सागर पाटील गव्हाड

मुंबई येथील मंत्रालयात राज्याचे परिवहन मंत्री मा.ना.श्री.प्रतापजी सरनाईक साहेब यांची *”मा.आ.संजयजी रायमुलकर साहेब”* यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना मेहकर येथील विविध विकास कामांसंदर्भात चर्चा केली.
मेहकर बस स्थानकाचे काम पूर्णत्वास जात असून त्या अनुषंगाने बस स्थानकासाठी १५ नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत मा. सरनाईक साहेबांनी मेहकर बस स्थानकासाठी १५ बसेस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
तसेच, सध्या सुरू असलेल्या अधिवेशनानंतर बस स्थानकाच्या लोकार्पणासाठी योग्य तारीख निश्चित करून कळविण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.
मेहकर शहराच्या सार्वजनिक वाहतूक सुविधांमध्ये मोठी भर पडणार असून नागरिकांना याचा निश्चितच लाभ होणार आहे.
या निर्णयामुळे मेहकर शहर व परिसरातील प्रवाशांना अधिक चांगली, नियमित आणि सुलभ बससेवा उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील प्रवास अधिक सुलभ होऊन व्यापारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लवकरच या बसेस मेहकर बस स्थानकात दाखल होऊन सार्वजनिक सेवेत रुजू होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.यावेळी
माजी मंत्री तथा आमदार श्री.तानाजी सावंत,आमदार श्री.अनिल बोंडेकर आदी उपस्थित होते.