बुलढाणा मुख्य संपादक दमदार २८न्यूज सागर पाटील गव्हाड

शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व आमदार सिद्धार्थ खरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या विरोधात कारवाई करा
बुलढाणा ,मेहकर, प्रतिनिधी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे व मेहकर लोणार मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करून सामाजिक व राजकीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी संदीप तट्टे व इतर दोषीवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन आज दिनांक 28 मार्च रोजी शिवसेना उबाठा पक्षाच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी,मेहकर व ठाणेदार,मेहकर यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दिनांक २२ मार्च २०२६ रोजी दुपारनंतर प्रसार माध्यमावर माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या विषयी निंदाजनक वक्तव्य करून आमदार सिद्धार्थ खरात यांना मारण्याची धमकी दिली. तसेच हा व्हिडिओ समाज माध्यमांद्वारे (फेसबुक, व्हाट्सॲप, इंस्टाग्राम) प्रसारित करून धमकी देऊन दादागिरीची भाषा वापरून आमदार सिद्धार्थ खरात यांना घरातून ओढून मारू, आमच्यावर असे वीस- पंचवीस गुन्हे आहेत आम्ही गुन्ह्याला घाबरत नाही,अशी आक्षेपार्ह भाषा संदीप तट्टे याने केली आहे. यामुळे दहशत निर्माण होऊन सामाजिक व राजकीय तेढ निर्माण करण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जीविताला काही धोका निर्माण झाल्यास होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही दिला आहे.
निवेदन देताना उपजिल्हाप्रमुख आशिष भाऊ रहाटे, तालुकाप्रमुख निंबाभाऊ पांडव, शहर प्रमुख तथा नगराध्यक्ष किशोरभाऊ गारोळे, युवा शहर प्रमुख आकाशभाऊ घोडे, तालुका समन्वयक संजय वडकर, नगरसेवक महेश रिंढे, नितीन तुपे, निसार अन्सारी, एडवोकेट संदीप गवई, डॉ. शेषराव बदर, साहेबराव हिवाळे, दत्तात्रय घनवट, परमेश्वर दहातोंडे, पंडित बापू देशमुख, अमोल बोरे, राजेक अली, सनी सांगळे,गोपाल गायकवाड, अमोल मोरे, विकास शिंदे,शुभम पानखेडे,विलास शिंदे, गणेश गावंडे, संतोष लाड, पवन टाले, गबाजी गवई, छट्टू गवळी, गजानन जाधव, राजू दांदडे, छगन सांगोळे, समाधान सरदार, महिला आघाडी प्रमुख स्वाती नवले आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.