
बुलढाणा प्रतिनिधी
मेहकर तालुक्यामधील जानेफळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा जानेफळचा विद्यार्थी इयत्ता 1ते4 विनित सागर गव्हाड यांनी नवोदय वर्ग ६ वीच्या प्रवेश परीक्षा संदर्भात हिवरा आश्रम येथील शिक्षकांचे योग्य वेळी मार्गदर्शन लाभल्याने, विनित आपल्या चिकाटी व मेहनतीच्या भरोशावर नवोदय प्रवेश परीक्षेत पात्र ठरल्याने जानेफळतून विनित ला नवोदय प्रवेश पात्रतेचा दिप. इयत्ता 5 मधील प्राथमिक शाळा कानेरी गवळी येथे ऍडमिशन घेतली
शैक्षणिक स्पर्धेच्या युगामध्ये पालक वर्ग आपल्या विद्यार्थ्यांना वर्ग ६ वी मध्ये प्रवेश मिळण्यासाठी अतोनात मेहनत घेत असतात.शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये पार पडलेल्या जवाहर नवोदय विद्यालय अकोला प्रवेश पात्रता परीक्षा साठी वर्ग पाचवी मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रयत्न करीत होते. मराठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हेरी गवळीचा वर्ग 5 चा कुशाग्र विद्यार्थी चि विनित सागर गव्हाड यांनी आपल्या आजोबा आजी, आई-वडिल, स्वप्न पूर्ण करण्यासाठी, बाल्य अवस्थेतील नटखट पणा , अफाट परिश्रम जिद्द अन चिकाटीच्या बळावर नवोदय प्रवेश पात्र परीक्षेत पात्र झाल्याने, त्यांचे व त्यांच्या परिवाराचे सर्व स्तरातून कौतुक केल्या जात आहे.वर्ग 6 पासून पुढील दर्जेदार शिक्षण संपूर्ण व्यवस्थे सह मोफत मिळणार आहे. केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा जानेफळ ,व केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा कान्हेरी गवळी परिसरातील गुणवत्तापूर्ण बहुआयामी शिक्षण देणारी शाळा असून आजवर प्रत्येक उपक्रमात शाळेने आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी केली व नवोदय निकालाने पुन्हा आपला दर्जा शाळेने निर्विवादपणे सिद्ध केला आहे. केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा जानेफळ मुख्याध्यापक चांदणे सर निकस सर व त्यांच्या सहकाऱ्यांना पालक शिक्षक सर्व शिक्षा करून तसेच इतर मंडळींनी विनित यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. मुलाच्या यशानंतर मुलाच्या यशस्वी अस्तित्वाने , मित्रमंडळींच्या नातेवाईकांच्या शुभेच्छा च्या वर्षावाने वडील व काकाचे हृदय भरून डोळ्याच्या पापण्या ओल्या होऊन आनंद आश्रुने आपल्या भावना व्यक्त केल्या.