नमस्कार, दमदार २८न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत. एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. ग्रामीण व शहरी भागात सध्या डिझेलचा तीव्र तुटवडा जाणवू लागला आहे. परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की, पेट्रोल पंपांवर डिझेल भरण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या ट्रॅक्टरच्या 1ते 2 किलोमीटरभर लांब रांगा लावाव्या लागत आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी चक्क जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजीनाथ मोरे सर व त्यांचे सहकारी यांच्या बंदोबस्ताखाली आज जानेफळ येथे पेट्रोल व डिझेल वाटप करण्यात आले. तसेच महसूल कर्मचारी पत्रकार मंडळी तसेच मुंदेफळ येथील सरपंच पती अनंत चांदणे मारोती पेठ येथील सरपंच पती गवई सर हे सुद्धा यावेळी उपस्थित होते
तसेच संजय भाऊ सुळकर हे सुद्धा तिथे उपस्थित होते.
पेट्रोल पंपा बाहेर लागलेल्या ट्रॅक्टरच्या लांब रांगा डिझेल पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन तिथे हजर होते आमचे कर्तव्यदक्ष ठाणेदार अजिनाथ मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित डिझेल आणि पेट्रोलचा वाटप सुरू झाला.
सध्या खरीप हंगामाची पूर्वतयारी आणि शेतीची कामे वेगाने सुरू आहेत. अशा ऐन गर्दीच्या वेळीच डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ट्रॅक्टर आणि इतर शेती अवजारां साठी डिझेल मिळावे म्हणून शेतकरी पहाटेपासूनच पंपां वर गर्दी करत आहेत. एका डिझेलच्या सुक्या थेंबासाठी शेतकऱ्यांना तासनतास ताटकळत पेट्रोल पंपावर उभे राहावे लागत आहे.
१ किलोमीटरच्या रांगा अनेक भागात पेट्रोल पंपांपासून तब्बल एक ते दीड किलोमीटरपर्यंत ट्रॅक्टरच्या रांगा पाहायला मिळत आहेत.
पोलीस बंदोबस्त: गर्दीमुळे कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, वाद होऊ नयेत यासाठी पेट्रोल पंपांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शेतीची कामे ठप्प: डिझेल वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची शेतीची कामे खोळंबली असून, त्यांच्यात तीव्र असंतोष पसरला आहे.
डिझेलच्या या तुटवड्यामुळे शेतकरी कमालीचा अडचणीत सापडला असून, प्रशासनाने आणि संबंधित कंपन्यांनी तात्काळ डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या टंचाईवर वेळीच तोडगा न निघाल्यास शेती हंगामावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.