बुलढाणा दमदार २८न्यूज सागर पाटील गव्हाड

मेहकर तालुक्यामधील घुटी येथील गोपाल गव्हाड पाटील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह कर्यकर्त्यांनी आत्मदहन करण्याच्या निवेदनावरून जानेफळ पोलिसांनी समय सुचकता दाखवत उपोषण कर्ते यांना वेळीच ताब्यात घेऊन संबंधित विभागाशी संवाद करून आत्मदहनापासून परावृत्त केले.
मेहकर तहसील कार्यालय मध्ये महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने अनेक वेळा विविध शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन देऊन त्यांची शासनाने दखल न घेतल्याने अखेर 10 एप्रिल रोजी शेतकरी कर्ज माफी, 24 -25 वर्षाचा शेतकऱ्यांचा पिक विमा, श्रावण बाळ योजनेचा पगार त्वरित जमा करावा, नवयुवकांना रोजगाराची संधी मिळण्यासाठी रोजगार मिळावे घ्यावे यासाठी जिल्हाध्यक्ष गोपाल गव्हाड आत्मदहन जानेफळ बस स्थानकावर 27 एप्रिल रोजी सोमवारी अकरा वाजता करणार त्यापूर्वीच पोलिसांनी सकाळीच त्यांच्या घरामधून ताब्यात घेऊन संबंधित कृषी व महसूल अधिकारी यांच्याशी त्यांचा संवाद करून शेतकऱ्यांच्या मागण्या वरिष्ठाकडे पाठवून न्याय देण्याचा प्रयत्न करण्याच्या आश्वासनाने उपोषणकर्ते यांनी पोलीस प्रशासनाला आत्मदहन आंदोलन मागे घेत असल्याचे लिहून दिले. पोलिसांनी आत्मदान करताना ताब्यात घेतल्याची माहिती करतात प्रवीण हिवाळे, धम्मपाल गवई, खरात, गवई, राहुल सरदार, चौरे , काळे व महिला मंडळी यांच्या समक्ष लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांना कार्यकर्त्यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांच्या समसूचकतेने आत्मदहन आंदोलनकर्त्यांचा जीव वाचला व प्रशासनाने मोकळा श्वास सोडला. पोलीस हा जनतेचा शत्रू नसून तो जनतेचा मित्र असल्याचे ठाणेदार अजिनाथ मोरे ,खुपीया ज्ञानेश्वर इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कर्तव्यावरून दाखवून दिले.
