बुलढाणा मुख्य संपादक दमदार २८न्यूज सागर पाटील गव्हाड

17 आरोपींवर गुन्हे, 25 हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त
बुलढाणा,जिल्ह्यात सुरू असलेल्या मटका, तासपट्टा जुगार व अवैध दारूधंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. विविध ठिकाणी छापे टाकून एकूण 17 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 25 हजार 625 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे… पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात पथके तयार करून ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत तामगाव, पिंपळगाव राजा, अंत्री, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, धामणगाव बडे व शिवाजीनगर या ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे टाकून आरोपींकडून रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले… तसेच लोणार व किनगाव राजा परिसरात अवैध दारू विक्रीवर कारवाई करत देशी दारू व साहित्य जप्त करण्यात आले. या सर्व कारवायांमध्ये एकूण 17 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा व दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रीनिकेत लोटे व अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून पुढील तपास संबंधित पोलीस ठाणे करत आहेत.