बुलढाणा मुख्य संपादक दमदार २८न्यूज सागर पाटील गव्हाड

पुणे
दिनांक :-१० मार्च २०२६
बुलढाणा,मेहकर येथे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात उभारण्यात येणाऱ्या अश्वारूढ पुतळ्याची पाहणीमेहकर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये लवकरच उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या अनुषंगाने आज पुणे येथे पुतळ्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.या स्मारक समितीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.प्रतापरावजी जाधव साहेब तसेच कार्याध्यक्ष म्हणून माझ्या नेतृत्वाखाली समितीचे सर्व सदस्य पुणे येथे दाखल होऊन पुतळ्याच्या निर्मितीबाबत सविस्तर माहिती घेतली.

यावेळी प्रसिद्ध शिल्पकार थोपटे सरांचे सहाय्यक श्री.पवार सर यांनी पुतळ्याची रचना, उभारणी,तांत्रिक बाबी,भव्यता आणि दिव्यता याबाबत समितीला सविस्तर माहिती दिली.या भव्य पुतळ्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –
▪️ पुतळ्याची उंची : २१ फूट
▪️ पुतळा बसविण्याची उंची : सुमारे ४५ फूट
▪️ अंदाजे वजन : सुमारे ८ टनमेहकर शहरासाठी हा पुतळा अत्यंत भव्य, दिव्य आणि प्रेरणादायी स्मारक ठरणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण सदैव जागृत ठेवणारा हा ऐतिहासिक उपक्रम ठरेल.यावेळी
शिवसेनेचे जेष्ठ नेते श्री.बबनभाऊ भोसले,शिवसेना संपर्कप्रमुख श्री.दिलीप बापू देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख व बांधकाम सभापती श्री.सुरेश तात्या वाळुकर,शहरप्रमुख श्री.जयचंदजी बाठीया,उद्योजक श्री.रवीशेठ अग्रवाल,उद्योजक श्री.जितूभाऊ सावजी,नगरसेवक श्री.विशाल काबरा,जेष्ठ पत्रकार श्री.सिद्धेश्वरजी पवार,नगरसेवक श्री.ओम सौभागे, शिवसेनेचे श्री.विनोदजी पहाड,श्री.तुळशिराम मानघाले,पत्रकार श्री.संतोषजी मलोसे व आदी उपस्थित होते.