
बुलढाणा, मेहकर, मुख्य संपादक दमदार २८न्यूज सागर पाटील गव्हाड
बुलढाणा,मेहकर येथिल आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जनसंवाद कार्यालयात थोर समतावादी संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले या वेळी मेहकर लोणार मतदार संघाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात, मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गारोळे व शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रा. आशिष रहाटे यांच्या हस्ते संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या वेळी नगरसेवक महेश रिंढे, नगरसेवक नितीन तुपे, नगरसेवक प्रा. सतीश ताजने, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष निसार अन्सारी, संदीप गारोळे, दत्ता घनवट, गणेश गावंडे, युवा सेना शहर अधिकारी ऋषिकेश जगताप, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष विश्वनाथ बाहेकर, अशोक मामा तुपकर, पत्रकार ज्ञानदेव मानवतकर, इंजि. दिनकर शिंदे, सुनील अंभोरे, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख आरती देशमुख यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.