मुख्य संपादक दमदार २८न्यूज सागर पाटील गव्हाड


मेहकर-लोणार मतदारसंघात शिवसेनेला बळकटी
बुलढाणा मेहकर तालुक्यातील दि.२४ मेहकर-लोणार मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठे बळ मिळाले असून शिवसेना आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली मेहकर तालुक्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी मातोश्री, मुंबई येथे शिवबंधन बांधून पक्षात जाहीर प्रवेश केला.
मेहकर तालुक्यातील डॉ. शेषराव बदर (सोनाटी), ॲड. गणेश देवकर (जानेफळ), संजय सुळकर (माजी सरपंच, उटी), नागेश शिंगणे (कळंबेश्वर, उद्योजक), राजेंद्र महाराज तळेकर यांच्यासह अनेक महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या सर्वांचा शिवबंधन सोहळा पार पडला.
यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, रवी म्हात्रे, नगराध्यक्ष किशोर गारोळे, तालुका संघटक संजय वडतकर, तालुका युवा अधिकारी ॲड. आकाश घोडे, प्रभाकर बनसोड आदी मान्यवर उपस्थित होते.
या जाहीर प्रवेशामुळे मेहकर तालुक्यात शिवसेनेची ताकद अधिक वाढली असून, आगामी काळात पक्ष संघटन अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत असल्याने परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे.



