जानेफळ मध्ये अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची मागणी
मुख्य संपादक दमदार २८न्यूज सागर पाटील गव्हाड

बुलढाणा मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे जानेफळ हे गाव मेहकर , खामगाव,शेहगाव या महामार्गावर मोठ्या लोकवस्तीचे गाव आहे अनेक इंग्रज कालीन वास्तू या ठिकाणी अजूनही स्थित आहेत छत्रपती शिवरायांना मानणारा मोठा वर्ग या गावांमध्ये असून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी जानेफळ येथे जानेफळ शिवसैनिक आणि शिवप्रेमी यांनी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न केला होता परंतु पोलीस प्रशासनाने पुतळा अवैध्य ठरवून गुन्हे दाखल करत सर्वांची तुरुंगात रवांनगी केली होती त्यामुळे सातत्याने या चौकात शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न होत असताना कायदेशीरपणे हा पुतळा उभारून छत्रपती शिवरायांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिक शिवसेनेने कंबर कसली असून माननीय खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर साहेब यांनी सहकार्य करत त्यांच्या मार्ग दर्शनात कायदेशीरपणे छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे हा पुतळा उभारण्यासाठी स्थानिक ग्राम पंचायतीने सुद्धा पुढाकार घेतला असून माननीय माजी आमदार संजय रायमुरकर यांनी निधी मंजूर केल्याची माहिती मिळाली आहे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जानेफळ गावात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात युवकांना स्वाभिमानाने धडे आपोआप मिळतील जानेफळ शिवसेनेचे शहर प्रमुख ग्रामपंचायत सदस्य मंडू उर्फ सचिन राजूरकर, विशाल फितवे, विजय काळे ,आकाश सवडकर यांनी निवेदन जिल्हाधिकारी महोदया यांच्याकडे शासकीय सर्व अटी व शर्ती यांची पूर्तता करून अधिकृत अश्वारूढ पुतळा उभारण्याची परवानगी देण्यात मागणी केली आहे या निवेदनावर सचिन राजूरकर ज्ञानेश्वर लिंबेकर ,सतीश केदारे,बाळू अग्रोया ,सागर मोरे ,यांचे स्वाक्षरी आहेत.