बुलढाणा मुख्य संपादक दमदार २८न्यूज सागर पाटील गव्हाड

बुलढाणा मेहकर,जानेफळ,स्थानिक अष्टविनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था जानेफळ यास सलग 3 वेळेस दीपस्तंभ पुरस्काराने गौरविण्यात आले असून संचालक मंडळ सभासद व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण आहे.
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातला बळकटी आणणाऱ्या पतसंस्थांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या हेतूने दीपस्तंभ पुरस्कार दरवर्षी दिल्या जात असतो सन २०२४ -२०२५ या वर्षासाठी अमरावती विभाग भाग २ गटामधून प्रथम क्रमांकासाठी अष्टविनायक पतसंस्थेची दीपस्तंभ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. नेहमीच सहकार, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक तथा शैक्षणिक क्षेत्रात अष्टविनायक पतसंस्थेने आपले वर्चस्व सतत कायम राखलेले आहे. ग्राहकांना तत्पर सेवा, सतत ऑडिट वर्ग अ तसेच जानेफळ सह परिसरातील ग्राहकांचा विश्वास संपादन करीत तत्पर सेवा व पारदर्शी कारभार असल्यामुळे दि.२४ फेब्रुवारी २०२६ रोजी आर्यन रिवर वूड रिसॉर्ट पुणे येथे सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असून महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयते, उदय जोशी, राष्ट्रीय अध्यक्ष सहकार भारती डॉ.रवींद्र भोसले, भास्कर बांगर यांच्या हस्ते संस्थेचे कर्मचारी सचिन वाळके यांनी स्वीकारला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेवर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.