कोणतेही व्हिडीओ समाज माध्यमावर टाकण्याअगोदर त्या व्हिडीओची पडताळणी करावी, म्हणजे अशांतता पसरणार नाही, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी केले आह
बुलढाणा पोलिसांचे आवाहन
बुलढाणा मुख्य संपादक दमदार २८न्यूज सागर पाटील गव्हाड

बुलढाणा,मेहकर : चिखला येथील घटना व त्यासंबंधी व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. या घटनेला पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घेत बहुतांश आरोपीदेखील अटक केले आहेत. अशातच सोशल मीडियावर काही व्हिडीओ प्रसारित होऊन समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. कोणतेही व्हिडीओ समाज माध्यमावर टाकण्याअगोदर त्या व्हिडीओची पडताळणी करावी, म्हणजे अशांतता पसरणार नाही, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यामध्ये बीबी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिखला काकड येथील घटनेने सध्या तणाव वाढला आहे. पोलीस प्रशासन याप्रकरणी सर्व गोष्टीवर गांभीर्याने लक्ष देऊन आहे. समाज माध्यमावर काही मेसेज प्रसारित करून समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे मेसेज किंवा व्हिडीओची सत्यता पडताळ्याशिवाय असले मेसेज किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकू नये. याशिवाय अफवा पसरणारे, दिशाभूल करणारे, भडकाऊ पोस्ट प्रसारित करू नये किंवा आलेली पोस्ट समोर पाठवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, नागरिकांनी सजग होऊन सोशल मीडियाचा वापर करणे गरजेचे आहे. त्यांनी समाजासमाजामध्ये निर्माण होणारी द्वेष भावना थांबवण्यासाठी सोशल मीडियावर अफवा पसरवणारी पोस्ट करणे टाळावी, कोणतीही संशयस्पद लिंक, व्हिडीओ, फोटो, ऑडिओ क्लिप्स शेअर करण्यापूर्वी त्याची खात्री करावी. समाजात तणाव निर्माण करणारी माहिती प्रसारित करू नये, जेणेकरून शांतता व सुव्यवस्था अबाधित राहिल, खाडे म्हणाले.