मुख्य संपादक दमदार २८न्यूज सागर पाटील गव्हाड

बुलढाणा, मेहकर तालुक्यातील वरवंड सिद्धांताश्रम उच्च प्राथमिक आश्रम शाळा वरवंड येथे ‘बाल आनंद मेळावा’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. केवळ पुस्तकी शिक्षण न देता मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यातील व्यावसायिक कौशल्यांचा विकास व्हावा, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
खाऊच्या गल्लीत चवींची मेजवानी
या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी लावलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल्स. भेळ, पाणीपुरी, सँडविच, वडापाव अशा चटपटीत पदार्थांपासून ते घरगुती पौष्टिक पदार्थांपर्यंत विविध स्टॉल्सवर पालकांनी आणि विध्यार्थ्यांनी गर्दी केली होती. विशेष म्हणजे, पदार्थांची विक्री करताना ‘हिशोब’ ठेवणे आणि ग्राहकांशी सौजन्याने बोलणे यातून मुलांनी व्यावहारिक शिक्षणाचे धडे गिरवले.
खाद्यपदार्थांसोबतच मेळाव्यात मुलांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.बाल आनंद मेळाव्याचे उदघाटन सिद्धांत आश्रम वरवंड चे संस्थापक अध्यक्ष ह. भ. पा. गुरुवर्य श्री भगवान महाराज यांनी केले व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थाचे भरभरून कौतुक केले.
अशा मेळाव्यांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो. व्यवहारिक ज्ञान वाढते,त्यांना संघकाम आणि आर्थिक व्यवहार समजण्यास मदत होते,भावी जीवनात याचा फायदा होईल असे मत मुख्याध्यापक श्री देवेंद्र पदमने सर यांनी व्यक्त केले.

शाळेच्या मैदानावर भरलेल्या आनंद महोत्सवात परिसरातील नागरिक आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संदिप राठोड यांनी केले तर शेवटी सर्व उपस्थितांचे श्री प्रविण डव्हळे यांनी आभार व्यक्त केले.बाल आनंद मेळाव्याचे नियोजन सर्व श्री रामदास गोळे,जनार्धन बोरे,विनोद वानखेडे,संदिप मळघने,विवेक कांबळे,गणेश लाड यांनी केले.यासाठी सर्व श्री नारायण चोंडकर,भिकाजी बोराडे,ज्ञानेश्वर सुरडकर,व रुपेश ढोरे यांनी परिश्रम घेतले.