मुख्य संपादक दमदार २८न्यूज. सागर पाटील गव्हाड

बुलढाणा मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मित निधनामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली दादांचा राजकीय प्रवास आणि सामाजिक बांधिलकी कर्तव्यनिष्ठ समय सुचकतेनुसार बोलणारे आणि कणखर स्वभावाचे म्हणून त्यांची राजकीय पटलावर ओळख आहे प्रशासनावर वचक आणि शासकीय योजनांची तंबूत माहिती असणारे महाराष्ट्राचे नेते अजितदादा पवार यांची यांचा आज अचानक दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्यामुळे महाराष्ट्राची राजकीय हानी झाली आणि दादा या नावाचा पर्व सर्वांसाठी आज मुकलं अजितदादा पवारांनी 19 59 ते 2026 या कालावधीत अनेक पदे भूषवली आणि सर्वात जास्त उपमुख्यमंत्री पदी विराजमान राहण्याचा सन्मान सुद्धा त्यांनी मिळवला त्यांच्या या आकस्मित जाण्याने पवार कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर आज काळा दिवस म्हणून पाळला गेला आणि त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गावाच्या वतीने एक शोकसभा आयोजित करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी गावातील सर्वच मंडळी उपस्थित होती.यामध्ये प्रामुख्याने राजेश पाटील नवले तालुका अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मेहकर. राजकुमार पाखरे सरपंच घाटबोरी. माजी सरपंच गजानन चनेवार. डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार नागरे साहेब. या मान्यवरांनी अजित दादा पवार यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यामध्ये उपस्थित महादेवराव नवले. गजानन धामणकर.भास्कर चोपडे. दिनकर लीडर. बाळू जानापुरे. संतोष बर्डे.संजय रानमळे.शेषराव अंभोरे.नालींदे मामा. यामध्ये गावातील सर्व समाजातील लोक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष अवसरमोल यांनी केले प्रास्ताविक पर भाषण राजू पाटील नवले यांनी केले आणि सर्वांच्या वतीने दादांना अखेरचा निरोप दिला…