बुलढाणा मेहकर मेहकर तालुक्यामधील जानेफळ येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण राष्ट्रीय उत्सव पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तामध्ये नायब तहसीलदार नालट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
श्री शिवाजी हायस्कूल जानेफळ येथील मुख्याध्यापक पद नियुक्ती , मुख्याध्यापकाने घेतलेल्या निर्णयासंदर्भात शिक्षण विभागाच्या वरिष्ठ विभागात व न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट असताना शिवाचे हायस्कूल च्या संचालकांनी काही महिन्यापूर्वी नवीन कार्यकारिणी जाहीर केली. नवीन कार्यकारिणीने तात्पुरती मुख्याध्यापकाची जबाबदारी गवई सरांकडे दिली असतांना ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण आजी व माजी अध्यक्ष मीच ध्वजारोहण करणार असा आग्रह धरल्याने, २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण दरम्यान वाद होऊ नये यासाठी ध्वजारोहण उत्सव पोलीस संरक्षणासाठी पोलीस स्टेशन व महसूल प्रशासनाला कळविले असता ध्वजारोहणाच्या दिवशी शिवाजी हायस्कूल येथे ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी एपीआय जाधव व अन्य पोलीस कर्मचारी व मेहकर तहसीलदार निलेश मडके यांनी नायब तहसीलदार नालट, मंडळ अधिकारी गणेश महाजन, तलाठी निलेश जाधव महसूल मित्र प्रमोद मिश्रा ध्वजारोहण उत्सव दरम्यान शांतता व सुव्यवस्था विस्कळीत झाल्यास कार्यवाहीसाठी घटनास्थळी राहून तहसीलदार यांनी दोन्ही बाजूच्या संचालकांना एक निर्णय घेऊन ध्वजारोहण करा! ध्वजारोहण दरम्यान शांतता सुव्यवस्था विस्कळीत झाल्यास कार्यवाही करावी लागेल. न्यायालय प्रविष्ट प्रकरण असल्याने आपआपली बाजू आपण न्यायालयात मांडावी असे सांगितल्यानंतर आजी व माजी संचालक अध्यक्ष ध्वजारोहण करण्यासाठी ध्वजारोहण स्तंभावर चढताच जानेफळ सरपंच पती गजानन वडणकर यांनी मध्यस्थी करून दोघांच्या हस्ते ध्वजारोहण न करता उपस्थित असलेले नायब तहसीलदार नालट साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यास दोन्ही बाजूच्या संचालकांनी मान्य करून ना. तहसीलदार नालट यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये श्री शिवाजी हायस्कूल मध्ये ध्वजारोहण केले.
