सागर पाटील गव्हाड मुख्य संपादक
बुलढाणा,मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे
अंबिका महिला अर्बन पतसंस्थेच्या वतीने पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी उत्साहात पार पडला. या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सय्यद मेहबूब भाई, पत्रकार हिम्मतराव आवले हे होते, तर पत्रकार रवींद्र वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा अंबिका महिला अर्बन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन धोटे पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मोहन धोटे पाटील यांनी पत्रकार समाजाचा चौथा स्तंभ असून समाजातील वास्तव लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करीत असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते कृष्ण हावरे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थापक अध्यक्ष मोहन धोटे पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी जानेफळ प्रेस क्लबचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य तथा परिसरातले पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांनीही आपली मनोगते व्यक्त करत अंबिका महिला अर्बन पतसंस्थेने केलेल्या या सत्काराबद्दल समाधान व्यक्त केले व संस्थेचे आभार मानले.
