प्रतिनिधी बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे एकाच व्यक्तीने शासनाच्या योजनेतून दोन वेळा विहिरीचा लाभ घेतल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे. प्रल्हाद कचरू शेजोळ, रा. सारशिव, ता. मेहकर यांनी 2002–03 मध्ये मेहकर पंचायत समिती अंतर्गत लाभ घेतल्यानंतर 2018–19 मध्ये चिखली पंचायत समिती अंतर्गत पुन्हा विहिरीचा लाभ घेतल्याचा आरोप आहे.
जोपर्यंत संबंधित व्यक्तीवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील.
या दुबार लाभामुळे गरजू शेतकरी योजनांपासून वंचित राहत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी कडक कारवाईची मागणी केली आहे.
आंदोलन चिखली पंचायत समितीसमोर आंदोलन
👉 एकाच व्यक्तीने विहिरीचा दुबार लाभ घेतल्याचा आरोप
👉 बनावट कागदपत्रांद्वारे शासनाची दिशाभूल
👉 दोषींवर कारवाई व लाभ वसुलीची मागणी
👉 कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

