मेहकर तालुक्यातील कासारखेड परिसरात बिबट्याने केला जनावरं वर हल्ला हल्ल्यात कालवडीचा मृत्यू.
सतिष मवाळ
बुलढाणा मेहकर तालुक्यात
कासारखेड शेतकरी येथील विश्वास दादाराव सवडतकर सकाळी दि. 1/1/2026 शेतात गेले असता त्यांचे दोन जनावरे बांधले होते. त्यामधिल चार पाच वर्षे चि कालवड बिबट्या ने मारून टाकल्याची घटनेची माहिती मिळताच. सतिश मवाळ यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात फोन द्वारे घटनेची माहिती दिली असता घाटबोरी वन परिक्षेत्र अंतर्गत मांडवा वर्तुळ व्हि.टी.मापारी वनपाल वडाळी बिट एस ए पडघान वन रक्षक हे घटनास्थळी हजर झाले घटनेस्थळी पोहचुन पाहणी केली.. यावेळी तलाठी देशमुख कृषी सहायक वाघमारे राजु सवडतकर सतिश मवाळ इत्यादी परीसरातील नागरिक उपस्थित होते
*या अगोदर ३१ डिसेंबरच्या सकाळी ही कळंबेश्वर दुधा रायपूर या परीसरात बिबट्या चे पिल्ले आढळून आले ते वन विभाग कडे देण्यात आले*
*31 डिसेंबरच्या सकाळी कळमेश्वर तथा दुधा परिसरात बिबट्याचे पिल्लू आढळल्याने त्या परिसरात एकच खळबळ उडाली होती आता अशा प्रकारे बिबट्याने जनावरं हल्ला केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे*
*शेतामध्ये ऊस गहू हरभरा इत्यादी पिके असून त्याला पाणी द्यावे लागते यासाठी रात्री शेतकऱ्यांना शेतात जावं लागत असल्याने आता अशा या बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले यामुळे आता शेतकऱ्यांनी रात्री लाईन न देता दिवसा लाईन द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने सतिश मवाळ यांनी केली आहे..*