*घुटी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2 अंतर्गत महिला शेती शाळा संपन्न*
प्रतिनिधी सागर पाटील गव्हाड
बुलढाणा मेहकर येथील घुटी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2पोखरा योजने अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान महिला शेती शाळा संपन्न. घुटी दिनांक 23/12 /2025 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय मेहकर अंतर्गत मौजे घुटी येथे हवामान अनुकूल तंत्रज्ञान हरभरा पीक शेती शाळा घेण्यात आली शेती शाळेमध्ये हरभरा पीक व्यवस्था याबद्दल सविस्तर माहिती सहाय्यक कृषी अधिकारी आर डी झोरे यांनी दिली शेती शाळा प्रक्षेत्रावर महाविस्तार AI ॲप बाबत माहिती देऊन योजना विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले शेती शाळेला समूह सहाय्यक, कृषी ताई, महिला ,शेतकरी बांधव उपस्थित होते
