दमदार २८न्यूज. मुख्य संपादक सागर पाटील गव्हाड
बुलढाणा मेहकर तालुक्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गस्त घालत असताना दोन टिप्पर अवैद्य खनिज वाहतूक करत प्रकरणी ९१ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करून गुन्हे दाखल करण्यात आले
दि. २०/०१/२०२६ रोजी रात्री २३.१० वा. संतोष खाडे उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर हे त्यांचे स्टाफसह जिल्हागस्त करीत असतांना फर्दापुर शिवार मेहकर ते जानेफळ रोड रायबा हॉटेलजवळ गौण खनिज रेती चोरुन वाहतुक करणारे आणि त्यास प्रोत्साहण देणारे ईसमांविरुध्द पोलीस कार्यवाही करण्यात आली असुन त्यांचे ताब्यातुन १) टाटाकंपनीचेटिप्परक्रं. MH२८ BB ९१०९ आडजुने वापरते कि.अं. २५००००० रु., २) गौण खनिज रेती ( वालु) अंदाजे ०६ ब्रास कि.अं. ४२००० रु., ३) एक ओपोकंपनीचा मोबाईल आडजुना वापरता कि.अं. ५००० रु. ४) एकसॅमसंगकंपनीचा मोबाईल आडजुना वापरता कि.अं. ५००० रु. ५) टाटाकंपनीचेटिप्परक्रं. MH२८ BB ९१८१ आडजुने वापरते कि.अं. २५००००० रु., ६) गौण खनिज रेती (वाळु) अंदाजे ०६ ब्रास कि.अं. ४२००० रु., ७) एक ओपोकंपनीचा मोबाईल आडजुना वापरता कि.अं. ५००० रु., ८) एक व्हिवो कंपनीचा मोबाईल आडजुना वापरता कि.अं. ५००० रु. असा एकुण कि.अं. ५१०४००० रु. चा माल मिळुन आला सदर टिप्परचे चालक, कंडक्टर आणि मालक यांचे विरुध्द पोलीस स्टेशन मेहकर येथे अपराध क्रं. ४८/२६ कलम 303(2), 49 BNS सह कलम 21(1), 21(2) खाण आणि खनिज (नियमन आणि विकास अधिनीयम 1957 अन्वये गुन्हा नोंद कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच ग्राम गोमेधर शिवारात जानेफळ ते मेहकर रोडवर गौण खनिज रेती चोरुन वाहतुक करणारे आणि त्यास प्रोत्साहण देणारे ईसमांविरुध्द पोलीस कार्यवाही करण्यात आली असुन नमुद आरोपी हे शासनाने निर्गमीत केलेल्या वैध परवान्यामध्ये शासनाची दिशाभुल करुन पेनाने खोडाखोड करुन बनावटीकरन करुन शासनाची फसवणुक करीत असल्याचे निष्पन्न होत असल्याने तसेच त्यांचे ताब्यातुन एक टिप्पर क्रं. MH २८ BY ५९७९ कि.अं. ४०००००० रु. तसेच गौण खनिज रेती (वाळु) अंदाजे ०६ ब्रास कि.अं. ४२००० रु., असा एकुण ४०४२००० रु. चा माल हस्तगत केला असुन सदर प्रकरणी वाहन चालक, मालक यांचेवर पोलीस स्टेशन जानेफळ येथे अपराध क्रं. १२/२०२६ कलम 303(2),318(4),336(3), 49 BNS सह कलम 48(7), 48(8) म.ज. अधि. 1966 सह कलम 21(1), 21(2) खाण आणि खनिज (नियमन आणि विकास) अधिनीयम 1957 अन्वये गुन्हा नोंद कार्यवाही करण्यात आली आहे. सदर दोन्ही गुन्हयात एकुण 9146000 रु. चा माल जप्त करण्यात आला आहे. सदर कार्यवाही श्री. निलेश तांबे पोलीस अधिक्षक बुलढाणा, श्री. अमोल गायकवाड अपर पोलीस अधिक्षक बुलढाणा यांचे मार्गदर्शनात संतोष खाडे उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर, स.पो.नि. अजिनाथ मोरे ठाणेदार पो.स्टे. जानेफळ पो.उप.नि. गणेश कड, पो.हे.कॉ. डिगांबर चव्हाण ब.नं. ५१२, पो.हे.कॉ. सुनील देशमुख ब.नं. ४३४, पो.हे.कॉ. उमेश घुगे ब.नं. ४२२, पो.कॉ. किशोर बोरे ब.नं. ४१२, पो.की. आकाश काळदाते ब.नं. २७०१ चालक पो.कॉ. सलीम गवळी ब.नं. २४००, उपविपोअ कार्यालय मेहकर यांनी केली आहे. महसूल मंत्र्यांच्या तसेच पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही झाल्याने अवैद्य गुण खनिज माफियामध्ये संतोष खाडे यांची दहशत पसरली आहे.
