जिल्हा प्रतिनिधी
बुलढाणा,खामगाव,लाखनवाडा येथे खामगाव तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला होता, पत्रकार दिनाचे औचित साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला. यामध्ये लाखनवाडा येथे गेल्या दहा वर्षापासून महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय लाखनवाडा येथे प्राचार्य पदावर काम करणारे प्राध्यापक रविंद्र गुलाबराव चाटे, यांचे परिसरामध्ये शिक्षण क्षेत्रात भरपूर असे योगदान आहे, विद्यार्थ्यांप्रती असलेली त्यांची आपुलकी जिव्हाळा , यास त्यांच्या स्वभावामुळे ते परिसरामध्ये प्रचलित आहे, प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असतो , विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, तसेच महाराष्ट्रभर व्याख्यान करणे लेख लिहिणे, यास मुळे त्यांना 30 डिसेंबरला राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार मिळाला , या अगोदर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला होता , म्हणूनच खामगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने लाखनवाडा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला..
