एसटीच्या सखोल स्वच्छता मोहिमेअंतर्गत मेहकर आगारातील सर्व बसस्थानकाची सखोल स्वच्छता अभियान संपन्न.
सतिश मवाळ
मेहकर महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली राज्य परिवहन महामंडळाची लालपरी म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी एसटी संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक खेड्यापाड्यापासून ते मोठमोठ्या शहरांपर्यंत दररोज लाखो प्रवाशांची ने – आन सुखरूप करत असते.याच लाल परीने शाळकरी मुले,महिला,पुरुष,जेष्ठ नागरिक,अपंग व्यक्ती आणि वयोवृद्ध व्यक्ती मोठ्या विश्वासाने लाल परीने दररोज प्रवास करीत असतात आणि त्यांच्यासाठी शासनातर्फे बऱ्याच वेगवेगळ्या योजना सुद्धा राबविण्यात येत आहेत.त्यामुळे मधल्या काळात लाल परीने प्रवास करणाऱ्यांची संख्या घटली असताना सुद्धा आज रोजी मात्र फार मोठ्या प्रमाणात याच लाल परीचे महत्त्व महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे.
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रतापराव सरनाईक यांनी बऱ्याच वेगवेगळ्या नवनवीन योजना मार्फत प्रवाशांच्या सोईसुविधांसाठी व लाल परी च्या उन्नतीसाठी ठोस निर्णय घेतलेले दिसून येतात.त्यांनी स्वतः महाराष्ट्रातील बऱ्याच बस स्थानकांना भेटी देऊन सुद्धा स्वच्छतेची पाहणी केल्यानंतर दररोज बस स्थानक स्वच्छ होत असताना आता नव्याने महाराष्ट्रातील प्रत्येक बस स्थानकाला महिन्याच्या 1 तारीख व 15 तारखेला सखोल स्वच्छता राबविण्याची मोहीम हाती घेतली आहे.याच मोहिमेच्या अंतर्गत बुलढाणा विभागातील मेहकर आगाराचे आगार व्यवस्थापक श्री हर्षल साबळे यांच्यासह वाहतूक निरीक्षक श्री अतुल सोनावणे व राकेश चौधरी,सहाय्यक वाहतूक निरीक्षक उत्तम राठोड यांच्यासह मेहकर आगारातील सर्व वाहतूक नियंत्रक व चालक वाहकांनी आज दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांचे जयंतीचे औचित्य साधून म्हणजेच पत्रकार दिनाच्या निमित्ताने मेहकर लोणार व सिंदखेडराजा या तिन्ही बस स्थानकाची सखोल स्वच्छता मोहीम राबवून बस स्थानक स्वच्छ केले आहेत.
..
मेहकर आगार अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक बस स्थानकाची दररोज चांगल्या प्रकारे स्वच्छता होत आहे.तरीसुद्धा नामदार परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार महिन्याच्या एक तारखेला व पंधरा तारखेला सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने आज दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी मेहकर लोणार व सिंदखेडराजा या तिन्ही बस स्थानकांवर सखोल स्वच्छता मोहीम राबवून बस स्थानक चांगल्या प्रकारे स्वच्छ करून मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.प्रवाशांनी सुद्धा आपले बस स्थानक स्वच्छ ठेवून सखोल स्वच्छता मोहिमेला सहकार्य करावे.
श्री हर्षल साबळे आगार व्यवस्थापक मेहकर आगार
