सतिश मवाळ
बुलढाणा मेहकर तालुक्यातील , देऊळगाव माळी येथिल रवींद्र भगवान सुरुशे यांना बुलडाणा दर्पणकार
बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त इंटरनॅशनल अॕचिवर्स अवॉर्ड पुरस्कारांची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी रवींद्र भगवान सुरुशे रा.देऊळगाव माळी, ता. मेहकर, जि. बुलढाणा येथील यांच्या दहा वर्षाच्या पत्रकारिता, कला, धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेवून त्यांना इंटरनॅशनल अॕचिवर्स अवॉर्ड सन्मानित करण्यात आला आहे.
या अगोदरही सुरूशे यांना योग पुरुष रामदेव बाबा यांच्या हस्ते उत्कृष्ट योगा पुरस्कार प्राप्त झाला आहे, जिल्हास्तरीय स्वामी पुरस्कार,
विदर्भरत्न पुरस्कार, इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार, मध्य प्रदेश दतिया येथे नेहरू युवा केंद्र मार्फत मुख्यमंत्री युवराज सिंह चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार अशा विविध पुरस्काराने ते करीत असलेल्या कार्यामुळे गौरव करण्यात आला. आणि आता इंटरनॅशनल अचीवर अवॉर्ड मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.३० वा. हॉटेल शांतीकमल, शिर्डी येथे
जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, गोरक्ष गाडीलकर मुख्य कार्यकारी अधिकारी शिर्डी, आंतरराष्ट्रीय ब्युटी पुरस्कार प्राप्त अभिनेत्री, जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे, पोलीस अधीक्षक वाघचौरे, आदी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट पत्रकारिता व कलाक्षेत्र, सामाजिक क्षेत्रात कार्य करत असल्याबद्दल इंटरनॅशनल अॕचीवर अवॉर्डने रविंद्र सुरूषे यांना तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन
सन्मानित करण्यात आले आहे.
